शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

राहुल गांधींना न्यायालयात खेचणार

'माफी मागायला माझे नाव राहुल सावरकर नाही,' असं विधान करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे मानहानीचा दावा करणार आहेत.
 
रणजित सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली नाही. केवळ काही अटी मान्य केल्या, हे जगजाहीर असतानाही खोटे विधान करून त्यांची बदनामी केली आहे. स्वातंत्र्यवीरांनी अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, कोलू ओढला.
 
सावरकरांनी केवळ आपलीच नव्हे तर अन्य क्रांतिकारकांचीही सुटका व्हावी, यासाठी अर्ज केले होते. कारागृहातून कुठल्याही प्रकारे सुटका करून घेऊन आपले कार्य चालू ठेवणं, ही केवळ सावरकर नव्हे, तर सर्वच क्रांतिकारकांची रणनीती होती, सावकरांप्रमाणेच सगळ्यांनीच सरकारी अटी मान्य करून सुटका करून घेतली आणि आपलं कार्य चालू ठेवलं, असे रणजीत सावरकर म्हणाले.