सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:22 IST)

मंत्रिपद न मिळाल्याने राजू शेट्टी वैफल्यग्रस्त: सदाभाऊ खोत

माजी खासदार राजू शेट्टी यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या मागे आता माणसे राहिली नसून ते आता 5 वर्षे काय 25 वर्षे हातकणंगले मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाहीत, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
 
शेट्टी एकदा भाजपबरोबर राहिले. या निवडणुकीत ते आघाडीबरोबर होते. या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे होतं. त्यांना राज्यमंत्रिपदाचा निरोप होता. म्हणून त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी देणंघेणं नाही, असं खोत म्हणाले.