मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

पुण्यात सिंहगड रोडवर संरक्षक भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू

Six people died
दोन दिवसांपूर्वी पुण्यातल्या कोंढवा भागात आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा असाच प्रकार घडला आहे. आंबेगावमधील सिंहगड कॉलेज कँपसची संरक्षक भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यृ झाला आहे.
 
या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरू आहे.
 
राधेलाल पटेल (२५), जेटू लाल पटेल (५०), ममता राधेलाल पटेल (२२) आणि जेटू चंदन रवते अशी मृतांची आतापर्यंत समजलेली नावं आहेत. मृत व्यक्ती मूळच्या छत्तीसगढच्या असल्याची माहिती मिळत आहे.