सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

सेमीफायनल खेळल्याशिवाय टीम इंडिया फायनल कशी गाठू शकते?

- नितिन श्रीवास्तव
टीम इंडिया मॅँचेस्टरमध्ये या वर्ल्ड कपची उपांत्य फेरी खेळण्यासाठी दाखल झाली आहे.
 
मात्र 9 जुलैला होणाऱ्या या सामन्यात एकही बॉल न खेळता भारत अंतिम फेरीत जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी वरुण देवाची कृपा विराट कोहलीच्या संघावर व्हायला हवी.
 
ब्रिटनच्या हवामान विभागाने मंगळवारचं हवामान ढगाळ राहील तसंच हलक्या सरींची शक्यता वर्तवली आहे.
 
जर पाऊस जोरात पडला तर मँचेस्टरला होणारा सेमी फायनल मॅचमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे आणि त्याहून विपरीत परिस्थिती उद्भवली तर सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
 
13 जूनला भारत आणि न्यूझीलंड मध्ये ट्रेंटब्रिजला होणारा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघाला एक एक गुण मिळाला होता. आताही असंच होईल का असा विचार करून निराश होण्याचं कारण नाही.
 
कारण, लीग मॅचेसमध्ये गुण दिले जातात मात्र सेमी फायनलमध्ये कोणत्याही कारणाने सामना झाला नाही तर एक दिवस आणखी राखीव ठेवला जातो.
 
मात्र 10 जुलै या राखीव दिवशी सामना झाला तर त्यादिवशी वातावरण ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. असं हवामान विभागाने सांगितलं आहे.
 
त्यामुळे बुधवारीही पाऊस कोसळला तर दोन्ही देशांना आणखी एक दिवस पुन्हा मिळणार नाही. कारण भारताच्या खात्यात 15 गुण आहे तर न्यूझीलंडच्या खात्यात 11 गुण आहेत. त्यामुळे भारताला फायनलमध्ये आपोआप स्थान मिळेल.
 
2019 चा वर्ल्ड कपमध्ये लीग मॅचेसमधील 45 पैकी 7 मॅचेसमध्ये पावसाचा परिणाम दिसून आला आहे. तीन मॅचेस तर अगदी एकही चेंडू न खेळता रद्द झाल्या आहेत. त्यात भारत आणि न्यूझीलंडच्या मॅचचाही समावेश आहे.
 
दुसऱ्या बाजूला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय यायला नको अशी अपेक्षा आहे. अॅजबेस्टनला होणाऱ्या या मॅचमध्ये पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी म्हणजे राखीव दिवशीही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
 
जर पाऊस झाला नाही तर ऑस्ट्रेलिया एकही बॉल न खेळता अंतिम फेरीत पोहोचेल.
 
स्वच्छ हवामानासाठी प्रार्थना
दरम्यान अनेक क्रिकेट चाहते आता मँचेस्टरला येण्यास सुरुवात झाली आहे. उपांत्य फेरीच्या वेळी हवामान स्वच्छ असावं इतकीच त्यांना अपेक्षा आहे.
 
रविवारी मँचेस्टर मध्ये चांगलं ऊन पडलं होतं. दुबईतून मॅच पहायला आलेल्या कुमार आणि त्यांची पत्नी प्रमिला म्हणतात, "पाऊस पडला तरी माझी हरकत नाही. पण सामना व्हायला हवा असंही वाटतं."
 
मी इथे शिकत असलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांशी बोललो आणि त्यांनी आपल्या आईवडिलांना कळू न देता मॅचचे तिकीटंही विकत घेतलेत. त्यातील एक जण म्हणाला, "पाऊस व्हावा अशी प्रार्थना करा. 2015 च्या सेमी फायनल नंतर भारताचा आणखी एक पराभव आम्ही नाही पाहू शकत."

फोटो: ट्विटर