शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (08:36 IST)

अरबी समुद्रातील शिवस्मारकात एक हजार कोटींचा भ्रष्टाचार-काँग्रेस

शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमासाठी नाही तर सुरुवातीपासूनच पैसे खाण्यासाठी होता हे स्पष्ट झालं असून, शिवस्मारक प्रकल्पातील भ्रष्टाचाराची कार्यपद्धती किळसवाणी आहे, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली.
 
प्रस्तावित स्मारकाचे चित्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत केंद्रीय दक्षता समितीकडे तक्रार केली असून, त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टात दाद मागू असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.