रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2019 (11:15 IST)

पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी घेतली मोदी-शाहांची भेट

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
 
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच त्रिपाठी यांनी मोदी व शहा यांची भेट घेतली. या भेटीत आपण राज्यातील स्थितीची माहिती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना दिली. मात्र भेटीचा सविस्तर तपशील आपण सांगू शकत नाही, असं त्रिपाठी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार पश्चिम बंगालमधील हिंसाचाराला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. तर भाजपनं हा आरोप फेटाळला असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं म्हटलं आहे.
 
काँग्रेसनंही पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून ममता बॅनर्जी आणि भाजपला लक्ष्य केलं. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याशिवाय निष्पक्ष निवडणुका होऊ शकत नाहीत, असं विधान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलं आहे.