बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पहिल्याच कॅबिनेट बैठकीत महत्वाचा निर्णय

पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादी किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या मुला-मुलींना दरमहिन्याला पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेतून शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही शिष्यवृत्ती फक्त सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनाच मिळत होती. पहिल्याच कॅबिनेटमध्ये पोलिसांच्या मुलांसाठी हा निर्णय घेत शहिदांच्या कुटुंबीयांना मोठा आधार दिलाय.
 
राष्ट्रीय संरक्षण निधीतून माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांना दरमहिन्याला उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीच्या रकमेमध्येही आता वाढ करण्यात आली आहे. मुलांसाठी ही रक्कम 2000 रुपयांवरुन 2500, तर मुलींसाठी 2250 रुपयांवरुन 3000 प्रति महिना एवढी करण्यात आली आहे. दरवर्षी शहीद पोलिसांच्या 500 मुलांना योजनेचा लाभ होईल. प्रत्येक वर्षासाठी 500 एवढी मर्यादा ठेवण्यात आली आहे.