शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

सुखा जाम

साहित्य - गायीच्या दुधाने बनलेले पनीर 250 ग्रॅम, 100 ग्रॅम मावा, 1टे. स्पू. आरारोट पावडर किंवा मैदा, 400 ग्रॅम साखर, थोडी खडीसाखर, तूप.

कृती - पनीर व खवा दोन्ही किसून घ्यावेत. त्यात आरारोट पावडर किंवा मैदा मिक्स करून खूप मळावे. लिंबाएवढा गोळा घेऊन त्यात एक खडीसाखरेचा तुकडा ठेवून गोल किंवा लांबट आकार द्यावा. असे सर्व गोळे तयार करून-तुपात मंद आचेवर तांबूस रंगावर तळून घ्यावे. साखरेचा तीन तारी पाक तयार करून त्यात तळलेले गुलाबजाम घालावे. पाकात चांगले मुरू द्यावे. पाकातून काढून पेपरकपमध्ये ठेवावे वरून चांदीचे वर्ख लावावे.