बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

सुके गुलाबजाम

साहित्य : पाव किलो खवा, अर्धा पाव किलो पनीर, २ टेबलस्पून मैदा, चिमूटभर बेकिंग पावडर, (२०० ग्रॅम साखर, शंभर मिली पाणी पाकासाठी, १ थेंब रोझ इसेन्स), जाड साखर, खोवलेले खोबरे १ थेंब लाल रंगात भिजवा.

कृती : खवा, पनीर मिक्सरमधून काढा. मैदा, बेकिंग पावडर चाळून मिसळा. अंडाकृती पण लहान गोळे बनवून मंद गॅसवर तळा. पाकात घाला. एक तासाने निथळून गुलाबी रंगवलेल्या खोबर्‍यात घोळवा. थोडा वेळ बाहेर ठेवा. लाल रंगाऐवजी आपण केशरी रंगातही घोळवू शकतो.