शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

पनीर लॉली पॉप

साहित्य : २०० ग्रॅम पनीर, १ इंच आल्याचा तुकडा, ५ ते ६ लसूण पाकळ्या, १ बारीक चिरलेला कांदा, ४ ते ५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ३ उकडलेले बटाटे, पाव वाटी बारीक केलेली कोथिंबीर. १ चमचा सोया सॉस, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ, पाव वाटी मैदा, ३ चमचे कॉर्नफ्लावर बेबी कॉर्न.

कृती : सर्वप्रथम पनीर किसनीवर बारीक करून, उकडलेले बटाटे किसनीवर बारीक करावे. बारिक चिरलेला कांदा, मिरची, आल, लसूण, कोथिंबीर, साखर, मीठ, सोयासॉस सर्व एकत्र करून त्यात, ३ चमचे कॉर्नफ्लॉवर, बटाटे आणि पनीरचं मिश्रण सर्व एकत्र करून त्याचे गोळे करून बेबी कॉर्नच्या जाड भागावर वरिल मिश्रणाचा गोळा दाबून लावा. त्यानंतर प्रत्येक गोळा मैद्याच्या पेस्टमध्ये घोळवून तेलात फ्राय करा. हे तीखट सॉस बरोबर खायला द्या.