कृती : खसखस, खरबूज, टरबूज, खोबरे, काजू (25 ग्रॅम), चारोळी यांना वाटावे. टोमॅटो व कांद्याला चिरून तळून वाटून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात जिरे व आलं घालून परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट व वाटलेले काजू टाकावे. 2 मिनिटाने कांदे व टोमॅटोचा मसाला टाकावा. खवा घालावा. 2 चमचे गरम मसाला आरी थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ टाकून काजू आणि कोथिंबीराने सजवावे.