कृती : प्रथम डब्यातील दूध, सादे दूध, साखर एकत्र मिसळून गॅसवर ठेवावे व सारखे ढवळावे. मिश्रण घट्ट होत आल्यावर खाली उतरवून 2 चमचे पिठीसाखर घालावी व मिश्रण तसेच गरम पातेल्यात ठेवावे. नंतर सुकामेवा घालून खूप ढवळावे व तूप लावलेल्या पाटावर मिश्रण थापावे व वड्या पाडाव्यात.