साहित्य : पनीर, साखर, बेदाणे, पिस्ते, बदाम, केशर किंवा केशरी रंग, मैदा.
कृती : पनीरामध्ये थोडा मैदा मिसळून पनीर चांगले दाबून ठेवावे. अर्ध्या तासानंतर पनीर काढून त्याचे लहा लहान तुकडे कापावेत. एका पातेल्यात दूध व साखर घालून आटवावयास ठेवावे. दूध आटत आल्यावर त्यात बेदाणे, पिस्ते आणि बदाम यांचे काप व केशर किंवा केशरी रंग घालावा. दूध जरा घट्ट होताच पनीराचे कापलेले तुकडे घालावेत व दूध पुन्हा चांगले उकळून घ्यावे. बासुंदीसारखे घट्ट होताच खाली उतरवून घ्यावे व वेलदोड्यांची पूड घालावी.