मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. बंगाली 'मिष्टी' स्वाद
Written By वेबदुनिया|

भुट्टा रोल्स

भुट्टा रोल्स पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 भुट्टे, 8-10 पालकाचे पानं, 1 कांदा, 1 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, कोथिंबीर, 1/4 नारळाचा कीस, मीठ चवीनुसार, 1 चमचा गरम मसाला, 1 चिमटी हिंग, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा तिखट व 1/2 चमचा खायचा सोडा, तळण्यासाठी तेल.

कृती : भुट्ट्याचे दाणे उकळून वाटून घ्यावे व त्यात सर्व साहित्य घालून मिश्रणाला चांगले एकजीव करावे. आता पालकाच्या पानांना चांगल्याप्रमाणे पसरवून घ्यावे, प्रत्येक पानावर थोडं मिश्रण घालून त्याचे रोल करावे. कढईच्या वर चाळणी ठेवून ते रोल वाफवून घ्यावे. नंतर गरम तेलात ते रोल तळून घ्यावे. सर्व्ह करताना चटणी व सॉस बरोबर द्यावे.