महाबलीपूरम् मंदिर

mahabalipuram
Last Updated: गुरूवार, 21 एप्रिल 2016 (14:13 IST)
तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई. याच चेन्नईपासून सुमारे 55 कि.मी. अंतरावर आहे सुप्रसिद्ध महाबलीपूरम् मंदिर. पूर्वी याच मंदिराच्या आवाराला माम्मलापुराम असे नाव होते. काळाच्या ओघात त्या नावाचा अपभ्रंश होत गेला आणि महाबलीपूरम् रूढ झाले. अर्थात महाबलीपूरम् हे निव्वळ एक मंदिर नसून हे आवार आहे.
यात 100 हून अधिक वेगवेगळी मंदिरे आहेत, असे मानले जाते. तमिळनाडूमधील अनेक भव्य आवारांपैकी हे एक प्राचीन स्थान मानले
जाते. सागर तटावर हे मूळ मंदिर बांधलेले आहे.

सातव्या शतकामध्ये ही पल्लव राजाची राजधानी होती. द्रविड वास्तुकलेच्या दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचे स्थापत्यशास्त्र अग्रणी स्थानावर होते. समुद्र तटावरील या मंदिरामध्ये अनेक शिवमूर्ती आणि लहान लहान मंदिरे दिसून येतात.
पुरातन काळात शिवसंकल्पनेमागे काय विचार होते, ते कसे विस्तारित केले गेले हे या मंदिराच्या शिल्पकलेतून आपणास अभ्यासता येऊ शकते. ‘चित्रभाषा’ हे या आवाराचे वैशिष्टय़ आहे. म्हणजेच मंदिराचा इतिहास लिखित स्वरूपात न कोरता आकृत्याच त्या गोष्टीरूपात मांडलेल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही भाषेची गरज न भासता कोणीही या मंदिराचा इतिहास समजून घेऊ शकतो. भारतातील प्राचीनपैकी खूप कमी मंदिरांबाबत हा असा विचार झाला आहे.
येथील लोकप्रिय रथ मंदिराच्या दक्षिणेला स्थित आहे. महाभारतातील पाच पांडवांच्या नावाने त्याला पांडव रथ म्हणतात. महाबलीपूरममधील
प्रवेशाकडील भागातील दगडाच भव्य शिला फोडून कृष्ण मंडप उभारला गेला आहे.
या मंडपाच्या प्रवेशद्वारावर तेथील ग्रामीण जीवनावर आधारित कथा कोरलेल्या आहेत.

mahabalipuram
भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका बोटावर उचलल्याचा प्रसंग तर अप्रतिम म्हणावासा चित्रबद्ध केला गेला आहे.
मंदिरावरील कोरीव काम हे अतीव कोरीव असे आता राहिलेले नाही. कारण इतक्या शतकानंतर वातावरणाचा परिणाम कलाकृतींवर झालेला
आहे. तरीही साधेपणा आणि सौंदर्य यांचा उत्तम मिलाफ या सर्व मंदिरांमध्ये दिसून येतो. या मंदिराभोवती अनेक भव्य पिवळसर रंगाच्या
शिळा आहेत. या दगडाचे वैशिष्टय़ म्हणजे कितीही उन्हाचा मारा असला तरी हा दगड विशेष तापत नाही. वराह येथील गुहा प्रसिद्ध आहेत.

राजा पल्लवाच्या 4 मननशील द्वारपालांसाठी! शिवाय या गुहा इतिहास अभ्यासकांतही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहेत.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार

ब्लॅक विडोची 'या' दिवशी रिलीज होणार
कोरोनामुळेअनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. हॉलिवूड इंडस्ट्रीवरही याचा परिणाम झाला आहे. ...

कनिका कपूर करोनामुक्त

कनिका कपूर करोनामुक्त
गायिका कनिका कपूरला अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शनिवारी तिचा सहावा रिपोर्ट ...

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत

शाहरुख आणि पत्नी गौरी अशी करत आहेत मदत
करोनाविरोधातील लढाईसाठी बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. ...

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली

एचबीओ अ‍ॅपने सेवा काही काळासाठी मोफत केली
लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ ...