Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमाचे प्रतीक- ताजमहल

Updated: गुरूवार, 30 मे 2019 (15:05 IST)
येथील हस्तकला जगभर प्रसिद्ध असून येथे संगमरवराच्या दगडावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. सोनेचांदी आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रकारच्या पेट्या तयार केल्या जातात. येथील जरदारीचे कपडे प्रसिद्ध आहेत. शहरातील सदर बाजार, किनारी बाजार, राजामंडी येथील बाजारात वि‍‍विध प्रकारच्या आकर्षक वस्तू पाहायला मिळतात. आग्रा पेठ्यासाठी (गजक) अत्यंत प्रसिद्ध आहे. तीळ आणि गूळ यांच्यापासून तयार केलेली ही मिठाई अत्यंत स्वादिष्ट असते.

ताजमहल
जगातील सात आश्चर्यांपैंकी ताजमहल हे एक आहे. आकर्षक व सुंदर ताजमहल प्रेमाचे प्रतीक म्हणून जगात प्रसिद्ध आहे. बादशहा शहाजहॉंने आपली प्रिय राणी मुमताज बेगमच्या स्मृत्यर्थ ताजमहाल बांधला. आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी ताजमहल बंद ठेवला जातो.

फतेहपूर सिक्री
फतेहपूर सिक्री आग्याची राजधानी म्हणून ओळखली जावी, असे सम्राट अकबराला वाटत होते. तसेच, सूफी संत शेख ‍सलिम चिश्‍ती यांचे घराणे येथील असल्याचे मानले जाते. महालात असलेले दिवाण-ए-आम, दिवाण-ए-खास (पच्चीसी दरबार) या वास्तु प्राचीन वास्तुकलेचे नमुने आहेत. हे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी ओसंडलेली असते. ताजमहालाच्या सौंदर्यावरून त्या काळातील कलाकारांच्या कलाकुसरतेची कल्पना केली जाते.

आग्रा किल्ला
येथील सांस्कृतिक प्रतीक म्हणून आग्रा किल्ल्याला ओळखले जाते. या किल्ल्याचे बांधकाम अतिशय मजबूत आणि आकर्षक आहे. हा किल्ला मुगलांचे निवासस्थान होते. या किल्ल्याचे दुसरे वैशिष्‍ट्य असे की, येथेच शहाजहानचा मुलगा औरंगजेबाला त्यांनी अटक करून ठेवले होते.

जामा मशीद
सन 1648 मध्ये शाहजहानची मुलगी जोहरी बेगमने प्रसिद्ध सूफी संत शेख सलिम चिश्ती यांच्या स्मृत्यर्थ जामा मशीद बांधली.

जेवणाची उत्तम व्यवस्था
आग्रा येथील पारंपारिक जेवण अतिशय चविष्ट आहे. त्यासाठी अनेक भोजनालये आहेत. स्थानिकांनी तयार केलेल्या स्वादिष्‍ट पदार्थांची चव चाखण्यासाठी लाखो पर्यटक येतात.

कुठे रहाल?
पर्यटकांना राहण्यासाठी येथे विविध प्रकारची हॉटेल्स आणि लॉजेस उपलब्ध आहेत. या हॉटेल्समध्ये पर्यटकांना लोकनृत्य, कठपुतळीचा खेळाचा आस्वाद भोजनासह घेता येतो.
कसे पोहचाल?
रेल्वे मार्ग
आग्रा हे देशातील महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे. येथून दिल्ली, वाराणसी आदी शहरात सहजपणे पोहचता येते.
रस्तामार्ग
मुंबई-आग्रा राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक-3 ची सुरवात येथून होते. तसेच, दिल्ली, फतेहपूर सिक्री, जयपूर, मथूरा या ठिकाणांहून येथे पोहचता येते.
हवाई मार्ग-
शहरापासून सात किलोमीटरवर विमानतळ असून येथून देशातील विविध ठिकाणी जाण्‍यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

शुगर डॅडी' वादावरून गोविंदाच्या पत्नीच्या समर्थनार्थ पुढे येत काश्मिरा शाहने केले विधान

गंभीर दुखापत झाल्यामुळे गौरव खन्ना 'खतरों के खिलाडी'मधून बाहेर पडला

रक्षाबंधन विशेष सुट्टीच्या काळात फिरायला जायचे का? कमी खर्चात सहलीसाठी ही ठिकाणे सर्वोत्तम

अक्षय कुमार १३ वर्षांनंतर विपुल शाहसोबत 'समूक'मध्ये आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या अवतारात परतत आहे

राष्ट्रगीत गाताना अडखळल्यामुळे हिना खान ट्रोल झाली

पुढील लेख
Show comments