शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

झोप आणि जागरण, याचे नियम जाणून घेणे आवश्यक

हल्ली भौतिक व्यस्ततेमुळे लोक रात्री उशीरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. व्यवहारात असंतुलनामुळे सामाजिक वातावरण देखील कुप्रभावित होतं. चांगली झोप आमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे आणि योग्य जागरण आमच्या चेतनेच्या विकास आणि जीवनात यश गाठण्यासाठी आवश्यक आहे. नियमाने चालणे आवश्यक आहे नाही नैसर्गिक आम्हाला आविष्यातून बाहेर काढेल. तर जाणून घ्या आवश्यक नियम 
 
झोपेचे नियम  :-
 
1. रात्री प्रथम प्रहरी झोपून जावे.
 
2. डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेत असावे.
 
3. शवासन मध्ये झोपावे. कुशीवर झोपायचं असल्यास उजव्या कुशीवर झोपावे. अती आवश्यक असल्यासच डाव्या कुशीवर झोपावे.
 
4. झोपण्याच्या तीन ते चार तासापूर्वी पाणी आणि अन्न त्याग करून द्यावे.
 
5. शास्त्रानुसार संध्याकाळ झाल्यावर आहार घेणे योग्य नाही.
 
6. झोपण्यापूर्वी दररोज पाच-दहा मिनिट ध्यान करून मग झोपावे. योग निद्रेत झोपू शकत असाल तर योग्य ठरेल.
 
आता जाणून घ्या उठण्याचे नियम :-
 
1. ब्रह्म मुहूर्तात उठणे सर्वात योग्य आहे. सूर्योदयाहून किमान दीड तासापूर्वीची वेळ म्हणजेच ब्रह्ममुहूर्त असतं.
 
2. अती विचार, कल्पना करणे हे अर्धजाग्रत अवस्थेचा भाग आहे. हे जागरणाच्या विरुद्ध आहे.
 
3. दिवास्वप्न बघू नये. दिवास्वप्न बघितल्याने मनाची दृढता संपते.
 
4. मन भटकत असल्यास ध्यान रूपात मनोरंजन करता येऊ शकतं याने जागरणाची रक्षा होईल.
 
5. नशा आणि तामसिक भोजन यामुळे जागरण खंडित होतं. हे शास्त्र विरुद्ध कर्म आहे.
 
6. ध्यान किंवा साक्षी भाव यात राहिल्याने जागरण वाढतं.
 
आता 6 कामाच्या गोष्टी
 
1. कधी झोपावे आणि कधी उठावे?
रात्री पहिल्या प्रहरीला झोपून पहाटे ब्रह्म मुहूर्तात उठून संध्यावंदन करावे. परंतू आधुनिक जीवनशैलीमुळे हे शक्य नसेल तर काय करावे? तेव्हा केवळ लवकर झोपून लवकर उठण्याचा प्रयत्न करावा.
 
2. झोपण्याची शैली आणि दिशा कशा प्रकारे असावी?
 
शवासन मध्ये झोपल्याने आराम मिळतो तसेच कुशीवर झोपण्याची पाळी आल्यास उजव्या कुशीवर झोपणे योग्य ठरेल. अत्यंत आवश्यक परिस्थितीतच डाव्या कुशीवर झोपावे. डोकं दक्षिण किंवा पूर्वीकडे असावे. या दिशेत डोकं ठेवून झोपल्याने आरोग्यासाठी फलदायी ठरतं.
 
3. पूर्वीकडे पाय का नसावे?
पश्चिम दिशेकडे डोकं ठेवून झोपू नये कारण अशा परिस्थितीत पाय पूर्वीकडे राहतील आणि शास्त्रांप्रमाणे हे अनुचित आणि अशुभ मानले गेले आहे. पूर्वीकडे सूर्याचा ऊर्जा प्रवाह होतं आणि पूर्वीकडे सर्व देव-देवतांचा निवास स्थान मानले गेले आहे.
 
4. दक्षिणीकडे पाय का नसावे?
वैज्ञानिक दृष्टिकोनाने बघितले तर पृथ्वीच्या दोन्ही ध्रुव उत्तर आणि दक्षिण ध्रुवमध्ये चुंबकीय प्रवाह अस्तित्वात आहे. दक्षिणीकडे पाय करून झोपल्याने व्यक्तीच्या शारीरिक ऊर्जा क्षीण होत जाते आणि व्यक्तीला सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो.
 
5. उत्तर दिशेकडे धनात्मक प्रवाह असतो आणि दक्षिण दिशेकडे ऋणात्मक प्रवाह असतो. आमच्या डोक्याचं स्थान धनात्मक प्रवाह आणि पायाचं स्थान ऋणात्मक प्रवाह असल्यामुळे हे दिशा  प्रदर्शित करणार्‍या चुंबकाप्रमाणेच आहे की धनात्मक प्रवाह असणारे आपसात जुळू शकत नाही.
 
यामुळे डोकं उत्तर दिशेत ठेवल्याने उत्तर दिशेची धनात्मक आणि डोक्यातील धनात्मक तरंग एकमेकांच्या विपरित पळ काढतील आणि यामुळे मेंदूतील अशांतता वाढेल आणि योग्य प्रकारे झोप येणे अशक्य होईल. यामुळे सकाळी उठल्यावर झोप अपूर्ण राहिल्यामुळे अधिक झोप काढण्याची इच्छा होते. तरी आराम मिळत नाही.
 
जेव्हाकी दक्षिण दिशेकडे डोकं ठेवून झोपल्याने मेंदूत काही हालचाल होत नाही आणि याने झोप चांगली येते. म्हणून उत्तरीकडे डोकं ठेवून झोपू नये.
 
6. झोपण्याच्या तीन-चार तासापूर्वी पाणी आणि अन्न त्याग करावे. याने पचन योग्य प्रकारे होत असून हे आरोग्यासाठी उत्तम ठरतं.