पर्वताची राणी ऊटी नयनरम्य हिल स्टेशन

Last Modified शुक्रवार, 4 जून 2021 (22:01 IST)
हिल स्टेशनला नयनरम्य हिल स्टेशन म्हणतात. भारतामध्ये डोंगरांच्या मोठ्या,लांब,सुंदर आणि आश्चर्यकारक श्रेण्या आहे.एका बाजूस विंध्याचल,सातपुडाचे डोंगर,तर दुसऱ्या बाजूस अरावलीचे डोंगर. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत,भारतामध्ये एका पेक्षा एक उत्तम पर्वत, पर्वतश्रेणी आणि सुंदर व मोहक खोऱ्या आहेत. उन्हाळ्यात इथे भेट देणे खूप संस्मरणीय आहे.हनिमूनला जायचे असल्यास इथे आवर्जून भेट द्या. चला भारतातील शीर्ष हिल स्टेशन पैकी एक ऊटी बद्दल माहिती जाणून घेऊ या.
1 ऊटी, जगातील प्रसिद्ध तामिळनाडू शहर हनीमूनसाठी सर्वात योग्य ठिकाण आहे. त्याला पर्वतांची राणी म्हणतात.उधगमंडलम किंवा ऊटी हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध करण्यासाठी जॉन सुलिवान यांचे योगदान मानले जाते.

2 ऊटी हा पूर्वी टोंगा आदिवासींचा गढ
होता. ब्रिटीश भारतात आल्यावर त्यांनी ऊटीला पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले. येथे ब्रिटीश राजवटीतील बरीच सुंदर बांधकामे अतिथींगृहाच्या रूपाने आपले स्वागत करताना दिसतील.
3 1848 मध्ये बनविलेले बोटॅनिकल गार्डन अजूनही पर्यटकांना आकर्षित करते. येथे विविध प्रजातींच्या वनस्पतींचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. दरवर्षी मे महिन्यात फुलांचे सुंदर प्रदर्शन येथे आयोजित केले जाते.

4 येथे हिरवीगार पालवी, चहाची बाग, दूरदूरपर्यंत पसरलेल्या विविध प्रकारच्या वनस्पती बघायला आपल्याला नक्कीच आवडेल. ऊटीमध्ये नीलगिरी पर्वतरांगांचा समावेश आहे. डोंगरावरील पर्वत, खोरे आणि पठाराचे विहंगम दृश्य खूप सुंदर अनुभव आहे. येथे हे मनोहर दृश्य बघण्यासाठी दुर्बिणीची व्यवस्था देखील केली आहे.
5 दोदाबेट्टा पीक,लॅम्ब्स रॉक, कोडानाडू व्ह्यू पॉईंट, बॉटॅनिकल गार्डन्स, अप्पर भवानी लेक, नीलगिरी माउंटन रेल्वे, सेंचुरी एवेलां आणि ऊटी लेक.इथे बघण्यासारखे आहे.

6 ऊटी लेकमध्ये नौकाविहार करा किंवा आपण मासेमारीचा करण्याचा छंद देखील पूर्ण करू शकता. हा तलाव निसर्गाने तयार केलेला नसून मानवांनी तयार केलेला आहे. हे
लेक कोयंबटूरचे जिल्हाधिकारी जॉन सुलिवान यांनी बनवले होते.
7 या व्यतिरिक्त सुंदर कॉटेज,फेच्ड फुलांचे बाग,छ्प्परच्या छता,सुंदर रस्ते,
काही किलोमीटर चालल्यानंतर आपण हिरव्यागार निसर्गाने स्वतःला वेढलेले बघाल.चीड चे झाडे मोठ्या प्रमाणात उगवतात.ऊटीच्या जवळ बघायला बरेच प्रेक्षणीय स्थळ आहे.

8 येथे आपण घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकता.लहान डब्याच्या गाडीत मुलं फिरू शकतात.लेक गार्डन पासून बनलेले हे बाग पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.
9 दोड्डाबेट्टा जवळ काहीच अंतरावर कालाहट्टी म्हणून सुंदर धबधबा आहे.यातील पाणी 36 मीटरच्या उंचीवरून खाली पडतं. ऊटीपासून 13 कि.मी. अंतरावर केटी व्हॅली आहे. ते कुन्नूर रोडवर आहे. कुन्नूर हे एक चांगले पर्यटन स्थळ आहे. पोनोलॉजिकल स्टेशन, लाज धबधबा, कलार कृषी फार्म आणि रैलिया धरण बघण्यासारखे ठिकाण आहे.

10 मुदुमलाई वन्यजीव अभयारण्य ऊटीपासून 67 कि.मी. अंतरावर आहे. आपण 1-2 दिवस राहिल्यास वन्यजीव अभयारण्याला भेट देणे आपल्यासाठी एक उत्तम अनुभव असेल. येथे बरीच वनस्पती आणि प्राणी आहेत. येथे दुर्मिळ प्रजाती आहेत. हत्ती, मोठी खारुताई (गिलहरी), सांभर, चितळ, भुंकणारे हरिण आणि उडणार्‍या खारुताई (गिलहऱ्या) येथे आढळतात. या अभ्याण्यात पक्ष्यांचे विविध प्रकारही बघायला मिळतात. यामध्ये रंगीबेरंगी पोपट, काळा सुतारपक्षी, गरुड इ.आहे.

कसे आणि केव्हा जायचे आणि कोठे रहायचे: -
1 एप्रिल ते जून ते सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात कोणीही येथे जाऊ शकेल.

2 मेत्तूपलयम हे मोठ्या रेल्वे लाइनचे रेल्वे स्थानक आहे. मोठ्या लाइनचे मुख्य रेल्वे जंक्शन कोयंबटूर आहे, जे सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे.
3 येथून जवळचे विमानतळ कोयंबटूर आहे, जे 100किमी अंतरावर आहे. चेन्नई, कोझिकोड, बेंगळुरू आणि मुंबई पासून कोयंबटूर थेट उड्डाण करू शकता.

4 आपण डेक्कन पार्क रिसॉर्ट, हॉटेल वेलबॅक रेसिडेन्सी, हॉटेल लेक व्ह्यू, हॉटेल ऊटी इत्यादी ठिकाणी राहू शकता.

फोटो स्रोत: तामिळनाडू ऊटी पर्यटन विभाग कडून

यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

तुला पाहिजे ती भाजी घे आणि घरी जा.

तुला पाहिजे ती भाजी घे आणि घरी जा.
कविताने आपल्या नवऱ्याला मेसेज केला :- अॉफीस वरून येतान भाजी घेऊन या... आणि सुजाताने ...

मुंबई: क्रूज ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन ...

मुंबई: क्रूज ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानने एनसीबीला दिले मोठे वचन
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नुकतेच क्रॉस ड्रग्स पार्टी प्रकरणात ...

स्वस्त आणि चांगली सहल हवी आहे, तर प्रवास करताना आपण या ...

स्वस्त आणि चांगली सहल हवी आहे, तर प्रवास करताना आपण या टिप्स अवलंबवून आपले  पैसे वाचवू शकता
आपण प्रवासाला जाण्याची योजना आखता तेव्हा आपण प्रवासासाठी योग्य ठिकाणाची निवड करता आणि ...

Big Boss Marathi 3 : अभिनेत्री सुरेखा कुडची बिगबॉस च्या ...

Big Boss Marathi 3 : अभिनेत्री सुरेखा कुडची बिगबॉस च्या घरातून एलिमिनेट झाल्या
या आठवड्यात बिगबॉस मराठीच्या घरातून अभिनेत्री सुरेखा कुडची या बाहेर पडल्या. गेल्या ...

नागराज मंजुळे यांचा आकाश ठोसर अभिनित नवा चित्रपट लवकरच ...

नागराज मंजुळे यांचा आकाश ठोसर अभिनित नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
सैराट, फ्रँडी, नाळ या सारखे यशस्वी चित्रपट बनवून प्रेक्षकांच्या मनात आपले घर करणारे ...