मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

Vagamon: केरळमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ वागामोन नक्की जा

munnar kerala
भारतातील सुंदर प्रेक्षणीय पर्यटन स्थळांपैकी एक दक्षिण भारतातील केरळ राज्य आहे. केरळ आपल्या नैसर्गिक सुंदरता, हिरवळ, धार्मिक ठिकाण, शांत वातावरण तसेच सरोवरांसाठी प्रसिद्ध आहे. केरळमध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. जे पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच या प्रेक्षणीय स्थळांमध्ये अशीच एक वागामोन नावाची जागा आहे. केरळच्या इडुक्की सीमेवर असलेले कोट्टायम वागामोनचे मुख्य आकर्षण आहे. तसेच हे ठिकाण खूप विलक्षण अनुभव देणारे आहे.
 
वागामोनचे प्रेक्षणीय स्थळे 
पाइन जंगल- पाइन जंगल मध्ये गेल्यावर तुम्ही सृष्टीच्या अगदी जवळ असल्याचा  अनुभव कराल. पाइन जंगलाला ब्रिटिश काळात बनवले गेले होते. तसेच संध्याकाळी या पाइन जंगलाच्या सौंदर्यात भर पडते.  
 
मारमला धबधबा- वागामोनच्या मुख्य आकर्षणपैकी एक आहे मारमला धबधबा. तसेच कोट्टायम जिल्ह्याच्या ईराटूपेट्टा मध्ये स्थित मारमला धबधबा हा वृक्ष, पर्वत तसेच घनदाट झाडांनी वेढलेला आहे. 
 
वागामोन सरोवर- हे सरोवर वागामोनमधील सर्वात सुंदर स्थळांपैकी एक आहे. तसेच हिरवेगार डोंगर, ग्रीन टी लावलेल्या बागांच्या मध्ये असलेले हे सरोवरचे पाणी खूप रमणीय आणि शांत आहे. हे शांततेची जाणीव करून देते. कुटुंब, मित्र किंवा पार्टनर सोबत या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात . 
 
उलीपुनी वाइल्ड लाइफ सेंचुरी- उलीपुनी वाइल्ड लाइफ सेंचुरी हे वागामोनमधील सुंदर स्थळ आहे. ज्यांना वन्य जीवांमध्ये रूचि आहे. त्यांनी अवश्य या जागेला भेट दयावी. काही वेळ निसर्गात राहून व्यतीत करू शकतात. इथे तुम्हाला हत्ती, वाघ तसेच इतर पण प्राणी देखील बघायला मिळतील. तसेच पर्वत आणि सरोवर मध्ये बोटिंग करण्याचा आनंद घेता येईल.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik