शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 31 मे 2021 (18:36 IST)

तामिळनाडूचे 8 प्रेक्षणीय समुद्री तटे,तीर्थक्षेत्रांसह पर्यटन स्थळ

पृथ्वीच्या 70.8 टक्के भागात समुद्र आहे.त्यापैकी 14 टक्के भाग विशाल हिंद महासागरानें व्यापलेला आहे. भारत देश तिन्ही बाजूने समुद्राने वेढलेला आहे.त्यातील 13 राज्ये त्याच्या सीमेवर आहे.या समुद्रतटावरून समुद्राला बघणे खूपच रोमांचकारी अनुभव आहे.    
 
ही राज्ये पुढीलप्रमाणे आहेत- 1आंध्र प्रदेश, 2 पश्चिम बंगाल, 3 केरळ, 4 कर्नाटक, 5 ओरिसा, 6 तमिळनाडू, 7 महाराष्ट्र, 8 गोआ, 9 गुजरात,10 पुडुचेरी,11अंदमान-निकोबार,12 दमण-दीव आणि13 लक्षद्वीप.चला आज तामिळनाडू बद्दल जाणून घेऊ या.
 
तामिळनाडूचे 5 समुद्री तट जे प्रेक्षणीय आहे तेथे फिरायला जावे.
तामिळनाडूत दोन शक्तीपीठ आहेत - पहिले सर्वाणी शक्तीपीठ कन्याश्रम कन्याकुमारी आणि दुसरे तामिळनाडूच्या जवळ चेन्नई येथे कोठेतरी अज्ञात रत्नावली कुमारी शक्तीपीठ आहे.
तामिळनाडूत बरीच प्राचीन शहरे आहेत, त्यातील एक महाबलीपुरम आहे, जे समुद्री किनाऱ्यावर वसलेले आहे. या शहराचा इतिहास खूप प्राचीन आणि भव्य आहे.महान भिक्षु बोधिधर्म हे फक्त पालव राजांच्या कारकिर्दीतच होते. रामेश्वर हे इथले सर्वात प्राचीन शहर देखील आहे,जिथे प्रभू श्रीरामजींनी शिवलिंगाची स्थापना केली.आदि शंकराचार्यांच्या चार मठांपैकी एक, 'श्रृंगेरी ज्ञानमठ' भारताच्या दक्षिणेस रामेश्वरम येथे आहे.
प्राचीन सप्तपुरींपैकी एक कांचीपुरम देखील तामिळनाडूत आहे.शंकराचार्यांचे मठ देखील येथे आहे.तामिळनाडूची इतर महत्त्वाची शहरे मदुराई,कुंभकोणम ऊटी,कोडैकानल, तिरुचिराप्पल्ली आणि कोयंबटूर आहे.ही सर्व ठिकाणे धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीकोनातून बघण्यासारखी आहे.तामिळ भाषा इथली अधिकृत भाषा आहे.
 
तामिळनाडूचे समुद्री तट-
 
1 मरिन-मरिन समुद्री तट चेन्नईच्या पूर्वीकडे आहे.इथे सूर्यास्ताचे दृश्य खूपच सुंदर दिसतात.
 
2 इल्लियोट-इल्लियोट हे समुद्री तट बसंत नगर येथे आहे.या ठिकाणी आंघोळ करण्याचा काही औरच मजा आहे.म्हणून याला बाथिंग बीच देखील म्हणतात.तरुण प्रेमींना भेटण्याचे हे ठिकाण आहे. 
 
3 कोवलम -कोवलम समुद्री तट हे चेन्नईपासून 40 किमी दूर महाबलीपूरमच्या मार्गात एक छोटंसं गाव आहे जे कोवेलॉंग नावाने ओळखले जाते.
 
4 महाबलीपूरम - महाबलीपुरम समुद्रकिनारा चेन्नईपासून  58 कि.मी. दूर दक्षिणेस आहे. येथील भव्य आणि सुंदर किनाऱ्या व्यतिरिक्त पल्लव घराण्याच्या काळाची  स्मारके आणि प्राचीन लेण्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत.
 
5 कन्याकुमारी- कन्याकुमारीच्या किनार्‍यावर (कन्याकुमारी बीच) हिंद महागर,अरेबिन आणि बंगालचा खाड्यांचे संगम येथे होतात.  हे हिंदूंचे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. कन्याकुमारी सूर्योदय, सूर्यास्त आणि पौर्णिमेच्या चंद्रमाला बघण्यासाठी प्रसिद्ध आहे. बहुरंगी वाळूसह,येथे समुद्र आणि आकाशीय दृश्य बघण्याजोगते आहे.
 
6 पूम्पुहर - पूम्पुहर समुद्री तट हे तमिळ महाकाव्य सिलापथिकरम मध्ये उपलब्ध माहितीच्या आधारे केवरिपूम्पात्तिनमच्या स्मरणार्थ बांधले गेले एक बेट आहे.
 
7 रामेश्वरम- रामेश्वरमचा समुद्री तट चेन्नईपासून 572 किमी दूर आहे.हे हिंदूंचे पवित्र स्थळ आहे.इथे 12 ज्योतिर्लिंगात येणारे भगवान शिवाचे मोठे आणि प्राचीन मंदिर आहे. भगवान श्रीरामाने हे शिवलिंग स्थापित केल्याने या स्थानाचे नाव रामेश्वर आहे.
 
8 नागापट्टिनमचे तट -तामिळनाडूच्या नागापट्टिनम जिल्ह्यातही नागौर तट, वेलनकन्नी, सिक्कल,कोदियाक्काराई, मन्नारगुडी आणि ट्रानक्वेबर सारखे अनेक सुंदर समुद्र तट आहेत. सर्व समुद्र तट प्रेक्षणीय असून एकदा तरी भेट देण्यासारखे आहे