रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (10:16 IST)

आंतरराष्ट्रीय युवा दिवस : स्वामी विवेकानंद यांचे विचार

* आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे
 
* विश्व एक व्यायामशाला आहे, जिथे तुम्ही स्वतःला मजबूत बनवण्यासाठी येता
 
* हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. 
 
* सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा
 
* जो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीचा दोष नाही.
 
* आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल
 
* बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे
 
* मन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका
 
* अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा. 
 
* पावित्र्य, धैर्य आणि दृढ़ता, या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत.
 
* चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या. 
 
* असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता
 
* जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.
 
* स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील
 
* धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात.
 
* महान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.
 
* सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
 
* उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका
 
* स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप आहे.
 
* संघर्ष करणं जितकं कठीण असेल तितकेच  तुमचं यश शानदार असेल.