रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीएमसी चुनाव 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (08:43 IST)

आता केवळ एकच लक्ष्य मुंबई महानगरपालिका : फडणवीस

devendra fadnavis
मुंबई महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार.अभी नही तो कभी नही, अशा आवेशात लढा. मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे अस माना.अभी नही तो कभी नही, आता केवळ एकच लक्ष्य मुंबई महानगरपालिका असा कानमंत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
 
पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्या मिशन मुंबई यासाठी सर्वांचंच योगदान महत्त्वाचं आहे. सर्वांनी जोरदार तयारी करायची आहे. वाॅर्ड रचना, प्रभाग याचा विचार करून चालणार नाही, काम करत रहावे. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर जनतेचा रोष आहे असेही ते म्हणाले.