2010 मध्ये अजय देवगन व कतरीना 'नंबर 1'वर
खान, कुमार आणि कपूरांना मात देऊन अजय देवगन नि:संशय या वर्षाचा नंबर वन स्टार झाला आहे. हिरोच्या रूपात त्याचे अतिथी तुम कब जाओगे, राजनीती, वंस अपॉन ए टाइम इन मुंबई, आक्रोश, गोलमाल 3 आणि टूनपुर का सुपरहीरो असे सहा चित्रपट रिलीज झाले, ज्यात चार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश मिळविले.
सुपरहिट चित्रपटांच्या संख्येत आणि व्यवसायच्या दृष्टीने पण अजय सर्वात पुढे आहे. त्याच्या चित्रपटाने या वर्षी आतापर्यंत 282 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दुसऱ्या नंबर वर आहे अक्षय कुमार. तसे तर अक्षयच्या चित्रपटांवर जितका पैसा लागला तो पूर्णपणे परत आलेला नाही पण त्याचे चार चित्रपटांनी 183 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. नंबर दोन वर आल्यानंतर देखील अक्षय या वर्षी फ्लॉप सिद्ध झाला आहे. सलमान खानचे दोन्ही चित्रपट दबंग आणि वीर ने किमान 180 कोटी रुपयांचा बिझनस केला.हिरॉईनची गोष्ट केली तर इंडो-ब्रिटिश ब्युटी कतरीना कैफ बॉलीवूडच्या नंबर वनवर विराजमान झालीय. आपल्या अदांनी तिने वर्षभर तिच्या चाहत्यांना घायाळ केलं. 'राजनिती'मध्येही तिने उत्तम काम केलं होतं. त्यानंतर 'शिला की जवानी'ने तिला 'नंबर 1'वर बसवलं. तिच्या दोन चित्रपटांचा व्यवसाय 142 कोटी रुपयांचा आहे. या रेसमध्ये करीना दुसऱ्या नंबरवर राहिली.