शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अंतराळवीराच्या भूमिकेत झळकणार आमिर

आमिर खान दंगलमधील फोगट पैलवानाच्या भूमिकेनंतर पुन्हा एका बायोपिकसाठी सज्ज होत असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून समजते. पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका आमिर करणार आहे.
 
एअरफोर्स पायलट राकेश शर्मा यांनी इस्त्रो आणि रशिया यांच्या संयुक्त कार्यक्रमांतर्गत 1984 मध्ये अंतराळात झेप घेतली होती. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. या कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणात इंदिराजींनी राकेश यांना अंतराळातून भारत कसा दिसतोय असा प्रश्न केला होता. तेव्हा राकेश यांनी सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा असा जबाब देऊन तमाम भारतीयांच्या हृदयात स्थान मिळविले होते. त्यांना अशोकचक्र व रशियाचा हिरो ऑफ द सोविएत युनियन असे सन्मान मिळाले आहेत. आमिर राकेश शर्मा यांची भूमिका साकारण्याबाबत खूपच उत्सुक असल्याचेही सांगितले जात आहे.