आलियाच्या आईच्या भूमिकेत माधुरी
लाखो हृदयांची धडकन अशी जिची ख्याती आहे, ती बॉलिवूडची धक धक क्वीन माधुरी दीक्षित आईच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. पुनरागमनानंतर सोनम कपूरच्या आईची व्यक्तिरेखेसाठी नकार देणारी माधुरी आता आलियाच्या आईचा रोल करणार का, याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात आहे.
अभिषेक वङ्र्कनच्या ‘शिद्दत’ चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन आणि अजरुन कपूर दिसणार आहेत. त्याचप्रमाणे माधुरीलाही या सिनेमासाठी विचारणा झाली आहे. या सिनेमाचं नाव आधी ‘कलंक’ होतं, नंतर ते बदलून ‘शिद्दत’ करण्यात आलं. त्यात आलियाच्या आईच्या भूमिकेत माधुरी दिसू शकते.
कमबॅकनंतरही तिने आजा नचले, देढ इष्किया, गुलाब गँग सारख्या चित्रपटात तिने वेगळ्या भूमिका केल्या. मात्र मुख्य हिरॉईनची आई साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ असेल. काही वर्षापूर्वी ती ‘झलक दिखला जा’ या डान्स रिअँलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत होती, आता ती ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’मध्येही जजच आहे.