जरीन खानवर रामगोपालचे डबल मीनिंग कमेंट
रामगोपाल वर्मा असं काही तर बोलतात की वाद निर्माण होतो, मुख्यता जेव्हा त्यांचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तेव्हा त्यांच्या कमेंट्सची संख्याही वाढते. यशासाठी प्रयत्न करत असलेले रामूची 'वीरप्पन' लवकरच रिलीज होणार आहे. यात जरीन खानवर 'खल्लास वीरप्पन' असा एक आयटमही आहे. सिनेमाचा प्रमोशन म्हणून रामूने जरीनची अशी प्रशंसा केली की त्याने रामूची मानसिकता कळून येते.
काय कमेंट केले रामूने
रामूने ट्विट केले की मला जरीन खानची एक गोष्ट खूप आवडते की ती सगळीकडून फार मोठी आहे. विशेषतः हृदय आणि मेंदूहून. हे ट्विट केल्यानंतर काही लोक नाराज झाले.
जरीन का आहे गप्प?
रामूच्या या ट्विटवर जरीन मात्र गप्प आहे. यातर तिने हा कमेंट गंभीरपणे घेतला नाहीये किंवा ही तिची मजबूरी आहे कारण सध्या तिच्या करिअरचा वाईट काळ सुरू आहे. खल्लास वीरप्पन तिच्या करिअरचं टर्निंग पाईंट ठरू शकतं कदाचित हे कारण असावा की ती गप्प आहे.