1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

फिटनेससाठी अक्षयकुमार माझा आदर्श : वरूण धवन

बॉलिवूड स्टार वरुण धवन फिटनेसच्या बाबतीत अक्षयकुमारला आपला आदर्श मानतो. आपल्या आगामी चित्रपट ‘ढिशूम’च्या कार्यक्रमावेळी त्याने आपले काही फिटनेस सिक्रेट सांगितले. 
 
तो म्हणाला की, एकेकाळी अनेक तरुणांमध्ये सिक्स पॅक आणि आठ पॅकची क्रेझ होती. पण आता सर्वजण आपल्या फिटनेसच्या बाबतीत जागरुक असतात. फिटनेससाठी अक्षयकुमारचा आदर्श घेण्यासारखा आहे. जखमी असूनही तो काम करतो. 
 
तारुण्य संपण्यापूर्वी अक्षयकुमारसारखं फिट राहायची इच्छा असल्याचं वरुणने यावेळी सांगितलं. या कार्यक्रमावेळी त्याच्यासोबत जॉन अब्राहमही उपस्थित होता. या दोघांनीही यावेळी उपस्थितांना फिटनेस टिप्स दिल्या.