शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 19 मे 2016 (11:15 IST)

मलायका अरबाजमध्ये झाला पॅच-अप, अरबाजकडे परतली मलायका?

बर्‍याच वेळापासून मलायका अरोडा आणि अरबाज खानच्या घटस्फोटाचे वृत्त येत होते पण आता या कपलमध्ये पॅच-अपची चर्चा आहे.  
 
मुंबई मिररमध्ये छापण्यात आलेल्या वृत्तानुसार मलायकाने शेवटी आपल्या नात्याला एक चांस देण्याचा मूड बनवला आहे. अरबाज आधीपासूनच या नात्याला जोडण्यात लागला होता. त्याला अस वाटत होते मलायकाने परत यायला पाहिजे पण मलायकाला असे करणे शक्य नव्हते. त्याशिवाय मलायका आपल्या नावापुढे खान शब्द हटवण्यासाठी फार चर्चेत होती. पण आता मलायकाने आपल्या संबंधांवर एकदा परत विचार करण्याचा विचार केला आहे.  
 
मलायकाच्या या निर्णयाचा पूर्ण श्रेय मलायकाची बहीण अमृता अरोडा आणि तिची आई जॉयसला जात आहे. असे म्हटले जात आहे की या दोघींनी मलायकाला तिचे संबंध सांभाळणे आणि अरबाजला ही प्रॉब्लम साल्व करण्यास सांगितले होते. मलायकाने देखील आपल्या आई आणि बहिणीने दिलेल्या सूचनेला गंभीरतेने घेत आपल्या संबंधाला एक संधी देण्याचे मन बनविले आहे आणि अशी चर्चा सुरू झाली आहे की मलायका अरबाजच्या घरी परतली आहे.  
 
मलायका आणि अरबाजच्या ब्रेकअपच्या वृत्ताने जेव्हा जोर पकडला तेव्हा मलायका मुलगा अरहानल घेऊन अरबाजचे घर सोडून बांद्रा स्थित आपल्या घरात शिफ्ट झाली होती. पण आता हा पावर कपल एकवेळा परत सोबत आहे तर या कपलच्या चाहत्यांसाठी ही फार आनंदाची बाब आहे.