मी गरोदर नाही: माही
बुद्ध इन अ ट्रॅफिक जॅम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री माही गिल दिसत नसल्यामुळे उलट सुलट चर्चाना सुरुवात झाली होती. माही गरोदर असल्यामुळे ती या चित्रपटाच्या प्रमोशनला येत नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. माही गरोदर आहे, तिनं सैल कपडे घातल्यानंतरही ती गरोदर असल्याचं दिसत होतं, अशा बातम्या आल्या होत्या. पण यावर आता खुद्द माही गिलनं स्पष्टीकरण दिलं आहे. या सगळ्या बातम्या म्हणजे अङ्खवा असल्याचं माहीनं सांगितलं आहे.
मी गरोदर असल्याचं कोणी सांगितलं? पाठीचं दुखणं सुरु असल्यामुळे मला व्यायाम करता येत नाही, त्यामुळे मी जाड झाली आहे, अशी प्रतिक्रिया माहीनं दिली आहे.