1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

विवेक ओबेरॉय साधतोय 'योग'

IFM
आयुष्यात शांतता नसेल तर माणूस सैरभैर होतो. शांततेच्या शोध घेण्यासाठी तडपत असतो. विवेक ओबेरॉयही शांततेच्या शोधात आहे. म्हणूनच सध्या तो योग करतोय. योगामुळे खूप शांतता लाभल्याचा त्याचा अनुभव आहे. आधीपेक्षा आपण आता जास्त शांत आणि उत्साही झालो आहोत, असे त्याला वाटतेय. सलमानशी घेतलेला पंगा, फ्लॉप चित्रपटांची रांग आणि ऐश्वर्या रॉयशी तुटलेले नाते या सगळ्यांमुळे विवेक अशांत होता. एवढी सगळी संकटे आल्यानंतर कोण शांत राहिल नाही का?