मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

शाहरुख खान अडचणीत

शाहरुख खान अडचणीत सिनेगप्पा
IFM
किंग खान मोठ्या संकटात अडकला आहे. मोहंम्मद पैगंबर यांच्यावर त्याने टीका केल्याचे प्रकरण अधिक तापत असून, बरेलीमधील दोन मुस्लिम संघटनांनी त्याच्या विरोधात फतवा काढत त्याची इस्लाममधूनच हकालपट्टी केल्याचे जाहीर केले आहे.

बरेलीमध्ये शाहरुखच्या विरोधात जोरदार निदर्शनेही करण्यात आली. त्याच्या पुतळ्याचे दहन करत त्याच्या चाहत्यांनीच त्याच्या विरोधात घोषणाबाजी केली.

बरेलीतील दारुल उलूम मजहरे इस्लामचे मुफ्ती मुतीर्रहमान रिझवी आणि एका अन्य मुस्लिम संस्थेचे प्रमुख मोंहम्मद शुएब रजा कादरींनी शाहरुख विरोधात फतवा काढत त्याला मुस्लिम धर्मात राहण्याचा काही एक अधिकार नसल्याचे म्हटले आहे.

शाहरुखने मोहंम्मद पैगंबर यांच्यावर टीका करून मोठी चूक केली असून, त्याला आता इस्लाम धर्मात कोणतेही स्थान नसल्याचे या दोन मुस्लिम धर्मगुरुंनी म्हटले आहे.