रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2016 (15:28 IST)

‘ग्रेट ग्रँड मस्ती’चा ट्रेलर सुसाट, आतापर्यंत 29 लाख हिटस्

‘मस्ती’ सीरिजमधील तिसरा अँडल्ट सिनेमा ‘ग्रेट ग्रँड मस्ती’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर यू टय़ूबवर तुङ्खान हिट झाला आहे. 
 
16 जूनला रिलीज झालेला हा ट्रेलर आतापर्यंत 29 लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. डबल मिनिंग डायलॉग असणारा या सिनेमात आधीच्या दोन्ही सिनेमांमधील अनेक किस्से असणार आहेत. 
 
त्याचसोबत भूतबंगल्याचाही समावेश करण्यात आला आहे. 
 
ग्रेट ग्रँडमस्तीमध्ये रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय, अङ्खताब शिवदासानी मुख्य भूमिकेत दिसणार असून, सना खान, उर्वशी रौतेला आणि पूजा चौप्रा मुख्य अभिनेत्री असणार आहेत. येत्या 22 जुलै रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.