रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘चल छैया छैया..’ करताना मृत्यू दिसला होता

मणिरत्नमचा दिल से चित्रपट आपल्याला माहितच असेल. शाहरुख खान, प्रीती ¨झटा आणि मनीषा कोईराला अशी स्टार कास्ट असलेला ‘दिल से’ प्रेक्षकांना खूप भावला होता. ए. आर. रेहमानच्या संगीताने चित्रपटाला चार चांद लावले होते. 
‘चल छैया छैया..’ असे एक आयटम साँग चित्रपट आहे. ज्यात शाहरूख खान आपल्याला मलायिका अरोरासोबत थिरकताना दिसतो. हे गाणं म्हणजे ‘दिल से’ चित्रपटाची जणू ओळखच होते. गाण्याचे चित्रीकरण तमिळनाडूतील उटी या थंड हवेच्या ठिकाणी झाले होते. येथील पर्वतांची रपेट घडवून आणणार्‍या ‘निलगिरी माउंटन रेल्वे’वर नाचत-गात, मजा-मस्ती करत ‘चल छैया छैया..’चे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले होते. 
 
मात्र या गाण्याविषयी मलायिका अरोराच्या मनात एक कटू आठवण आहे. नुकताच ‘तो’ प्रसंग तिने आपल्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. ज्यावेळी ‘चल छैया छैया..’वर नाचतानाचे शूट ‘निलगिरी माउंटन रेल्वे’वर चालू 
होते, त्यावेळी मलायिकाला एका ठिकाणी अपघात झाला होता. ती चालत्या रेल्वेवरून खाली पडली असती. हा अपघात इतका भयानक होता की, ज्यात तिचा मृत्यू झाला असता. पण दैव कृपेमुळे वाचल्याचे मलायिका सांगून जाते. हा प्रसंग आजही आठवला तरी वेदना होतात, असेही तिने म्हटले आहे.