‘शिवाय’चा ट्रेलर रिलीज
अजय देवगणच्या मच अवेटेड ‘शिवाय’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झालं आहे. विशेष म्हणजे या सनेमात अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील अजय देवगणने केली आहे. ‘शिवाय’ या अँक्शन थिल्रर सिनेमात अजय देवगणने शिवभक्ताची भूमिका साकारली आहे. टिटरद्वारे अजय देवगणने ट्रेलर रिलीज करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
‘ना आदि ना अंत है उसका, वो सबका ना इनका उनका, वही शून्य है वही इकाय, जिसके भीतर बसा शिवाय।’, अशा कॅप्शनसह अजय देवगणने ट्रेलर शेअर केले आहे. अजय देवगणसोबत या सिनेमात अभिनेत्री सायेशा सेहगल दिसणार आहे.
या सिनेमातून पोलंडची अभिनेत्री एरिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘शिवाय’ या दिवाळीच्या मुहूर्तावर 28 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.