सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (15:01 IST)

धनुषच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

अभिनेता धनुषचा  हॉलिवूड सिनेमा ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. लेखक केन स्टॉक यांच्या ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ या पुस्तकावर या सिनेमाची कथा आधारित आहे. पुस्तकाच्या नावावरुनच सिनेमाचे नाव ठेवण्यात आले आहे. सिनेमाचे पोस्टर ‘सिने व्यापार विश्लेषक’ रमेश बाला यांनी त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केले आहे. सिनेमाचे चित्रीकरण मुंबई (भारत), ब्रुसेल्स (बेल्जियम), रोम (इटली) आणि पॅरिस (फ्रांस) अशा जगभरातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले आहे.