सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 4 नोव्हेंबर 2017 (11:28 IST)

OMG! शाहरुखची लाडली सुहानाच्या टी-शर्टची किंमत तब्बल…

बॉलीवुड सुपरस्टार शाहरूख खान याची लाडली सुहाना खान इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक पॉपुलर स्टार किड्‌सपैकी एक आहे. सतरा वर्षीय सुहाना स्वतःला ग्लॅमरच्या या जगापासून दूर ठेवू इच्छित आहे. मात्र, तिचा लुक आणि ड्रेसिंग सेन्समुळे ती साततत्याने चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी आई गौरीच्या हॅलोवीन पार्टीत गोल्डन ड्रेसमध्ये दिसली होती. आता वडील शाहरुख खानच्या बर्थ डे पार्टीत ती कॅज्युअल लूकमध्ये आली. पण टॉप टू बॉटम पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये असलेल्या सुहानाच्या टी शर्टची किंमत ऐकून तुम्हाला आश्‍चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार आहे.
 
गिवेंची (Givenchy) चे टी-शर्ट, त्यासोबत डेनिम शॉर्टस आणि पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स परिधान केलेला सुहानाचा हा लूक कूल होता. पण सुहानाच्या फक्त टी-शर्टची किंमत सुमारे 52 हजार रुपये होती.
काही दिवसांपूर्वी सुहानाने परिधान केलेल्या ऑरेंज रंगाच्या ड्रेसची किंमत सुमारे 60 हजार रुपये होती. या ड्रेसमुळे सुहाना ट्रोलही झाली होती.
 
मुंबईतील धिरुभाई अंबानी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सध्या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेणारी सुहाना सुट्टीसाठी भारतात आली आहे. दरम्यान, सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. त्याचवेळी ती एका ऑडिशन स्टूडिओमध्ये दिसली होती. शिवाय शबाना आझमी यांनीही सुहानाच्या अभिनयाचे कौतुक केले होते.