शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

20 वर्ष जुना उधारीचा चुम्मा शिल्पाला पडला महागात

1996 साली रिलीज झालेला 'छोटे सरकार' सिनेमात शिल्पा शेट्टी, गोविंदा आणि कादर खान मुख्य भूमिकेत होते. यातील एक गाणं 'एक चुम्मा तो मुझको उधार दे दे, बदले में यूपी-बिहार ले ले' खूप लोकप्रिय झाले होते. यावर शिल्पाने खूप ठुमके लावले होते. 

20 वर्षानंतर शिल्पावर आरोप करण्यात आला आहे की तिने उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांची प्रतिमा मलिन केली आहे. शिल्पासह गोविंदा, गायक उदित नारायण, अल्का याज्ञनिक, निर्देशक विमल कुमार यांनाही आरोपात सामील करण्यात आले आहे.
 
झारखंड कोर्ट 30 जून रोजी छोटे सरकार केस ची सुनावणी करेल. शक्य आहे की शिल्पाला 'शोकाज़' नोटिस पाठवण्यात येईल.
 
तसेच या गाण्यात बंगाल, आसाम, गुजरात व इतर राज्यांचे नावाला घेण्यात आले आहे.