अभिनेता राकेश बेदी आणि त्यांच्या पत्नीच्या ज्वाइंट अकाउंट मधून काढले 4.98 लाख, साइबर पोलिसांची तपास यंत्रणा सुरु
Cyber Fraud with actor Rakesh Bedi and his wife: भाभी जी घर पर हैं आणि तारक मेहता का उल्टा चश्मा शो मध्ये तारक मेहताचे बॉसची भूमिका निभावणारे अभिनेता राकेश बेदी (69) आणि त्यांची पत्नी अराधना (59) यांच्या बँक अकाउंटमधून 4.98 लाखाचा फ्रॉड ट्रांसफर झाला आहे. हे फंड कोणत्याही ओटीपी शिवाय ट्रांसफर झाले आहे.
या प्रकरणाबद्दल पोलीस अधिकारी म्हणाले की, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. आम्ही त्या बँकेशी संपर्क केला आहे, जिथे यांचे पैसे जमा आहेत. बँकेला आम्ही सांगितले आहे की खाते ब्लॉक करा असे. साइबर क्राइम पोलिसांनी फ्रॉड करणाऱ्या लोकांना ट्रेस केले आहे.
अधिकारी म्हणाले की, हा फ्रॉडचा वेगळा प्रकार आहे, या फ्रॉड करणाऱ्या लोकांनी फ्रॉड करण्यासाठी लिंक, रिमोट एक्सेस किंवा ओटीपीच्या माध्यमातून काही डेटा प्राप्त केला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टअनुसार राकेश बेदी म्हणाले की, ते नंतर या गोष्टीवर बोलतील. जेव्हा की, त्यांच्या पत्नीने या प्रश्नावर काही उत्तर दिले नाही.
राकेश बेदीच्या पत्नीने या प्रकरणाची तक्रार करत सांगितले की, कॉल वर कोणीतरी इन्फॉर्म केले की, चुकीच्या पद्धतीने अकाऊंटमधून 4,98,694.50 रुपये काढण्यात आले आहे. त्या व्यक्तीने फोन वर सांगितले की, एक ओटीपी आला आहे. ज्याला त्यांनी सांगावे यानंतर मी लागलीच फोने कट केला.
पोलिसांनी सांगितले की, 4.98 लाख रुपये राकेश बेदी आणि त्यांची पत्नीच्या ज्वाइंट अकाउंट मधून विना काही डिटेल देत काढण्यात आले आहे. वारंवार वाढणारा साइबर क्राइम खर्च चिंतेचा विषय आहे. व माहिती प्राप्त होताच आम्ही गुन्हेगारापर्यंत पोहचू.
Edited By- Dhanashri Naik