मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जून 2018 (09:02 IST)

अंगुरी भाभीचा बोल्ड अंदाज, बिकीनीतले फोटो केले शेअर

लोकप्रिय टीव्ही सीरियल भाभीजी घर पर है मधील अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेचा इन्स्टाग्रामवरील फोटो चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी परदेशात फिरण्यासाठी गेलेल्या शुभांगीने काही फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेत. यात तिने काळा आणि गुलाबी रंगाची बिकीनी घातलीये. टीव्हीवर सोज्वळ रुपात दिसणाऱ्या अंगुरी भाभीचा हा बोल्ड अंदाज काही चाहत्यांना पसंत आला तर काहींनी जोरदार टीका केलीये. 
 
दुसरीकडे अंगुरी भाभीने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलेय. बीचवर मी कोणते कपडे घालावेत अशी तुमची अपेक्षा आहे. साहजिकच मी बीचवर साडी वा पंजाबी ड्रेस घालू शकत नाही. मी या ड्रेसमध्ये स्वत:ला फिट समजतेय आणि स्विमसूट घआलू शकते. मला माझ्या पोस्टवर कोणताही पश्चाताप होत नाहीये. मला हे आवडले आणि मी पोस्ट केले. माझ्या नवऱ्याने हा फोटो काढला. टीव्ही स्क्रीनवरही जर स्क्रिप्टची गरज असेल तर मी बिकीनी घालण्यास कचरणार नाही असे म्हटले आहे.