मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मे 2018 (09:38 IST)

सलग 17 वर्ष कान्समध्ये प्रतिनिधित्व करणारी ऐश्वर्या एकमेव

कान्स फेस्टिव्हलमध्ये सलग 17 वर्ष भारताचं प्रतिनिधित्व करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन ही पहिली बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. ऐश्वर्या राय बच्चनने पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये सहभाग घेतल्यानंतर नीता लुल्लाने डिझाईन केलेली साडी परिधान केली होती. त्यावेळेस शाहरूख खान आणि संजय लीला भंसाली यांच्यासोबत 2002 साली कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला होता. ऐश्वर्याच्या सौंदर्याचं, तिने परिधान केलेल्या कपड्यांकडे नेहमीच सार्‍यांचे लक्ष असते. 2002 साली पहिल्यांदा ऐश्वर्या राय बच्चन देवदासच्या स्क्रिनिंगसाठी कान्समध्ये पोहचली होती. त्यावेळेस साडी परिधान करून आलेल्या ऐश्वर्यावर टीका करण्यात आली होती.