गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (15:03 IST)

अजय देवगणचे वडिल वीरु देवगण यांचे निधन

Ajay Devgan father Veeru Devgan passes away
प्रसिद्ध अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि अभिनेता अजय देवगणचे वडिल वीरु देवगण यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
 
त्यांच्या पश्चात चार मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वीरू देवगण आजारी होते. रिर्पोट्सप्रमाणे कार्डिक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला. वडिल आजारी असल्यामुळे अजयने दे दे प्यार दे चित्रपटाचे काही प्रमोशन इव्हेंट्स देखील रद्द केले होते.
 
वीरू यांनी दिलवाले, हिम्मतवाला, शहंशाह, लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यासारख्या ८० हून आधिक चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. 
 
विलेपार्ले येथील स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.