शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (15:18 IST)

अल्लू सिरीशने प्री-लुक पोस्टरसोबत केली आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा!

एबीसीडीनंतर दोन वर्षांनी, अल्लू सिरीशने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली असून गुरुवारी प्रदर्शित करण्यात आलेल्या या प्री-लुक पोस्टरने प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. चाहत्यांद्वारे काही वेळातच #Sirish6 ट्रेंड होण्यास सुरुवात झाली आहे.
 
चित्रपटाच्या या प्री-लुकमध्ये एका गहन दृश्यात एक युगुल दिसते आहे, ज्यात वरती कलाकारांची नावे आहेत, टॉलीवुड पोस्टरचा विचार करता, हा एक रेफ्रेशिंग अनुभव आहे. चित्रपटात अल्लू सिरीश (Allu Sirish) सोबत अनु इमैनुएल (Anu Emmanuel) असून ‘विजेता’ (Vijetha) फेम राकेश ससी (Rakesh Sasi) यांचे दिग्दर्शन आहे. जीए2 पिक्चर्स (GA2 Pictures) द्वारा निर्मित, या चित्रपटाला अल्लू अरविंद (Allu Aravind) यांनी प्रस्तुत केले आहे.
 
अल्लू सिरीश, नुकताच एका गाजलेल्या हिंदी सिंगल व्हिडीओ 'विलायती शारब' मध्ये दिसला होता जे काही वेळातच प्रचंड व्हायरल झाले आणि बघता बघता त्याने 100 मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला. चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये ते अजुनही आपली जागा कायम ठेवून आहे. एबीसीडीशिवाय अल्लू सिरीशचा आणखी एक चित्रपट ओक्का क्षनम (Okka Kshanam) हिंदीत ‘शूरवीर’ या नावाने डब करण्यात आला आहे. तेलुगु आणि मल्याळम चित्रपटातील अल्लू सिरीशची कामगिरी चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि म्हणूनच त्याचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत. या प्री-लुक पोस्टरने तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
 
अल्लू सिरीशच्या वाढदिवशी, म्हणजे 30 मे ला ‘फर्स्ट लुक’ येणार असल्याची घोषणा या प्री-लुक पोस्टरद्वारे करण्यात आली असून निर्मात्यांद्वारे ‘फर्स्ट लुक’ प्रदर्शना आधी याचा आणखी एक प्री-लुक आणण्यात येणार आहे.