शनिवार, 27 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :मुंबई , मंगळवार, 12 डिसेंबर 2017 (10:14 IST)

अनुष्का आणि विराट झाले विवाहबद्ध

anushaka and virat
गेल्या आठवड्याभरापासून चर्चा असलेला अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीचा विवाह आज खरोखर झाला. इटलीमध्ये तुस्कानी येथील रिसॉर्टमध्ये एका भव्य समारंभामध्ये हे दोघे विवाहबद्ध झाले. यावेळी दोघांच्याही कुटुंबियांसह मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिसॉर्टवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निमंत्रण पत्रिकेशिवाय कोणालाही प्रवेश नाकारला होता. हा विवाह सोहळा 15 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
 
विराट आणि अनुष्काच्या विवाहाबाबत गेल्या आठवड्यांपासून वेगवेगळ्या वावड्या उठत होत्या. या दोघांचे आगोदरच लग्न झाले आहे, इथपासून त्यांचे लग्न होण्याची अफवाच आहे, इथपर्यंत सगळ्या बातम्यांना आज अखेर पूर्णविराम मिळाला. या दोघांच्या लग्नसमारंभाच्या तयारीचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यातच अनुष्काचा लग्नाच्या तयारीतला फोटोही प्रसिद्ध झाला.
 
दोन्ही कुटुंबे इटलीला रवाना झाल्याचेही बघितले गेले होते. मात्र अनुष्काच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने हे वृत्त फेटाळल्याने संदिग्धता निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्ष विवाह संपन्न होईपर्यंत ही संदिग्धता कायम राखली गेली. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला मात्र ही खात्रीलायक बातमी लपवून ठेवता आली नव्हती. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंधांमध्ये होते. त्यांनी एकत्र काही जाहिरातीही केल्या होत्या. त्यांच्या प्रेमप्रकरणावरून क्रिकेट आणि सिनेरसिकांनी पुष्कळ गॉसिपही केले होते.