शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 जून 2022 (08:54 IST)

आश्रम 3: बॉबी देओलच्या 'निराला बाबा'चा चमत्कार, काही तासांतच कोट्यवधींनी पाहिला शो

आश्रम या सीरिज चा तिसरा सीझन मॅक्स प्लेअर वर आला असून तो अनेक कारणांनी वादग्रस्त होत आहे. ही सीरिज रिलीज झाल्यापासून 32 तासातच 100 मिलियन व्ह्यूज झाले आहे, असं मॅक्स प्लेअरने सांगितले आहे. या सीरिज मध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे. आश्रम सीरिज 2020 मध्ये पहिल्यांदा मॅक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आली होती.
 
या सीरिजचा मुख्य पात्र बॉबी देओल निराला बाबाच्या भूमिकेत आहे. बॉबी देओलने निराला बाबा या गुंड प्रवृत्तीच्या भोंदूबाबाची व्यक्तिरेखा साकारली आहे. पैसा आणि सत्तेच्या बळावर वेगवेगळ्या बेकायदा व्यवहारात त्याचा हात आहे. या सीझनमध्ये निराला बाबा आणखी निडर झाले आहेत.
 
त्यांच्या आश्रमात ड्रग्स, महिलांचं शोषण अशा गोष्टी करून निराला बाबा अजेय होऊ इच्छित आहे. हीच सगळी कथा सीझन 3 मध्ये आहे.
 
सीझन 1 पासून असलेली आदिती पोहनकर म्हणजेच पम्मी अजूनही या बाबाच्या मागे आहेत. ती निराला बाबाच्या मागे अजुनही आहे. तिचा सूड पूर्ण होतोय का हे पडद्यावर पाहणं इश्ट होईल.
 
आश्रम च्या तिसऱ्या सीझनमध्ये सोनिया (ईशा गुप्ता) चा प्रवेश हा एक नवा विषय आहे. ती आपल्या कामासाठी बाबाच्या आश्रमात येते.
 
या सीझनमध्ये बॉबी देओल, आदिती पोहनकर, चंदन रॉय संन्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, इशा गुप्ता, सचिन श्रॉफ, अध्यययन सुमन, त्रिधा चौधरी, या कलाकारांचा समावेश आहे.
 
शूटिंग दरम्यान झाला होता हल्ला
26 ऑक्टोबर ला भोपाळमध्ये या सीरिजचं शूटिंग सुरू असताना बजरंग दलाने हल्ला केला होता. या हल्ल्यात दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या शूटिंगना मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली होती. या हल्ल्याचं गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी पाठिंबा दिला होता.
 
पपा, तुम्ही कामावर का जात नाही?
या सीझनच्या निमित्ताने बॉबी देओल ने बीबीसी हिंदीला मुलाखतही दिली होती. 'बरसात' या 1995 साली आलेल्या चित्रपटापासून आपलं करिअर सुरू करणारा अभिनेता बॉबी देओलच्या चित्रपट कारकिर्दीला 25 वर्षांपेक्षाही जास्त काळ उलटला आहे.
 
यादरम्यान बॉबीने अनेक चढउतार पाहिले. त्याने आपल्या स्टारडमचा तो काळही पाहिला, ज्यावेळी त्याच्याप्रमाणे लांब केस आणि सनग्लासेसची क्रेज तरूणांमध्ये होती.
 
तर बॉबीचे चित्रपट येणं जवळपास बंदच झालं होतं, असेही दिवस त्याने पाहिले आहेत. सध्या बॉबी देओल मोठा पडदा आणि OTT या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहे.
 
बीबीसीशी बोलताना बॉबी म्हणाला, "माझ्या करिअरची सुरुवातीची सात-आठ वर्षे उत्तमरित्या चालली. आधी मला माझ्या फेस व्हॅल्यूवर काम मिळायचं. पण माझं काम मागच्या दाराने हिसकावलं जाईल, असं मला कधीच वाटलं नाही. पण मी अनेक प्रोजेक्ट गमावले. असं झाल्यानंतर तुम्ही चुकीचे चित्रपट निवडू लागता. लोकांना तुमच्यासोबत काम का करायचं नाही, हे तुम्हाला समजू शकत नाही. मग हा आपला पराभव आहे, असं तुम्ही मानू लागता."
 
आपला वाईट काळ आठवताना तो सांगतो, "मी स्वतःची कीव करू लागलो होतो. असं कधीच करू नये. पण जेव्हा मी बाहेर जायचो. फॅन्स भेटायचे. आम्ही तुला स्क्रीनवर पाहण्यासाठी आतूर आहोत, असं ते म्हणायचे. त्यावेळी मला वाटायचं, माझ्या फॅन्सना मला पाहायचं आहे, मग मला काम का मिळत नाही?
 
बॉबी देओलच्या मते, तो कधी मोठा स्टार किंवा सुपरस्टार बनण्याच्या फंद्यात पडला नाही. त्याला लोकांच्या मनात आपलं घर करायचं होतं. पण एकामागून एक फ्लॉप चित्रपटांमुळे लोक त्याच्यासोबत काम करणं टाळत असल्याचं बॉबीच्या लक्षात आलं.
 
तो सांगतो, "मी पराभव पत्करला होता, अशी वेळही आली होती. माझी मुलं खूप लहान होती. ती म्हणायची, पप्पा तुम्ही घरात बसून असता, कामावर का जात नाही? मम्मी कामावर जाते. तेव्हा मला लक्षात आलं की मी नेमकं काय करतोय."
 
बॉबी देओलने आपल्या वाईट काळाबाबत सांगताना सलमान खानचा आवर्जून उल्लेख केला. तो म्हणतो, "सलमान खान मला जेव्हा-जेव्हा भेटायचा, तेव्हा म्हणायचा दाढी काय वाढवलीय उगीच."
 
त्यामुळे निराला बाबा स्क्रीनवर कितीही शक्तिशाली असला तरी प्रत्यक्ष आयुष्यात त्याचा प्रवास बराच निराळा आहे.