Ayushmann Khurrana Birthday : आयुष्मानने पहिल्या चित्रपटाला मानले शाप, त्यानंतर हिटट्रिक हिट

Last Modified सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (15:04 IST)
आयुष्मान बॉलीवूडमधील बहुगुणी कलाकारांपैकी एक आहे. अभिनयाव्यतिरिक्त आयुष्मानने आपल्या नृत्य, गाणी, लेखन यांनी चाहत्यांची मनेही ओढली आहेत. आयुष्मान प्रत्येक प्रकारच्या पात्रामध्ये फिट बसतो. पण तो त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाला शाप मानतो.
आयुष्मान खुराना 2004 मध्ये एमटीव्ही शो रोडीजमध्ये दिसला होता. शो जिंकल्यानंतर आयुष्मानने अँकरिंगच्या
जगात प्रवेश केला. त्यानंतर, २०१२ मध्ये त्याने 'विक्की डोनर' या पहिल्या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पण त्याचा हा चित्रपट त्याच्यासाठी शाप ठरला. या चित्रपटा नंतर आयुष्मानने बरेच चित्रपट केले पण हे सर्व चित्रपट फ्लॉप ठरले. पण त्याने हार मानली नाही आणि आपल्या सुपरहिट चित्रपटाची तयारी सुरूच ठेवली.
एका मुलाखतीदरम्यान आयुष्मानने म्हटले होते की तो स्वत: आपला पहिला विक्की डोनर चित्रपट 'शाप' मानतो. आयुष्मान म्हणाला होते की, 'माझ्या पहिल्या चित्रपटाचा शाप आहे की माझे बाकीचे चित्रपट फ्लॉप होतात. विक्की डोनर हा एक बेंचमार्क चित्रपट होता ज्याने माझ्याकडे लोकांच्या अपेक्षा वाढवल्या. विक्की डोनरनंतर आयुष्मानने नौटंकी साला, बेवकूफियां आणि हवाईजादा या फ्लॉप चित्रपटांची हॅटट्रिक केली.
यानंतर आयुष्मान 2015मध्ये भूमी पेडणेकर सोबत 'दम लगा के हैशा' चित्रपटात दिसला. हा चित्रपट लोकांच्या हृदयात घर करून गेला. चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या चित्रपटासाठी आयुष्मानने खूप कष्ट केले. चित्रपटाच्या कथेनुसार आयुष्मान भूमी पेडणेकरपेक्षा हलके दिसायला हवे होते. ज्यासाठी त्याने आपले वजन देखील कमी केले.
आयुष्मान खुराना याच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल सांगायचे झाले, तर आयुष्मानने 'विक्की डोनर' च्या साहाय्याने मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. या चित्रपटामुळे त्याचे नशिब बदलले. यानंतर तो सतत 'नौटंकी साला', ' बेवकूफियां ' आणि ' हवाईजादा ' मध्ये दिसला. पण हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडले. 2015 मध्ये आयुष्मान खुरानाचा ‘'दम लगाकर हईशा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटा नंतर आयुष्मानच्या कारकीर्दीला पुन्हा वेग आला. त्याच्या मुख्य चित्रपटांमध्ये 'बरेली की बर्फी', 'शुभ मंगल सावधान', 'अंधाधुन', 'बधाई हो', 'आर्टिकल 15' आणि 'ड्रीम गर्ल' यांचा समावेश आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

घरात कालनिर्णयच लावतात ना

घरात कालनिर्णयच लावतात ना
मला आज पर्यंत समजलेले नाही, टी व्ही वर दररोज नवनवीन रेसिपीचा कार्यक्रम बघून सुद्धा घरी ...

दीपिका पादुकोणने केले कन्फर्म, शाहरुख खानसोबत 'पठाण'मध्ये ...

दीपिका पादुकोणने केले कन्फर्म, शाहरुख खानसोबत 'पठाण'मध्ये सिल्वहर स्क्रीनवर परतणार
सुपरस्टार शाहरुख खान यावर्षी पठाण चित्रपटासह रुपेरी पडद्यावर धमाल करणार आहे. यशराज ...

नवऱ्याची २१ कर्तव्ये

नवऱ्याची २१ कर्तव्ये
०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे. ०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, ...

Kamal Hassan Health Bulletin: कमल हसन हॉस्पिटलमध्ये दाखल, पायाच्या हाडामध्ये झाले होते इन्फेक्शन
अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी ...

"लॉकडाऊन" ने किमया केली बरे !!

चिन्मयचे पप्पा : (आनंदाने) अगं, आपल्या चिन्मयचा फोन आलाय. सुनबाईला दिवस गेलेत. आपण आजी- ...