शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (08:27 IST)

खरच पुण्यात पुन्हा लॉकडाऊन? जाणून घ्या काय आहे सत्य

पुणे शहरात पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे, अशी जी अफवा पसरवली जात आहे त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. शहरात कुठेही लॉकडाऊन लावण्यात येणार नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
 
शहरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शहरातील काही भाग नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला. त्यानंतर  शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात सकाळपासूनच पत्रे लावण्यात आले. त्यामुळे  पुन्हा शहरात लॉकडाऊन लावण्यात येणार आहे का? असा सवाल नागरिकांना सतावत होता. त्यात सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने एक आदेश काढून प्रभाग क्र. ४२ व परिसरातील भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले व नवीन नियमावली जाहीर केली. त्यामुळे, नागरिकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला होता.
 
 पुणे शहरात कुठेही लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. पुणे शहर हे देशातील करोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनला आहे. याबाबत मुंबई आणि दिल्ली या महानगरांनाही पुण्याने मागे टाकले असून दररोज सुमारे दीड हजार नागरिकांना करोनाची बाधा होत असल्याचे समोर येत आहे. त्याचबरोबर, मृतांचा आकडाही सरासरी चाळीशी गाठत आहे.
 
त्यावर काही दिवसांनी नव्याने कंटेन्मेंट झोन निर्मित करतो. जिथे रुग्ण संख्या कमी झाली तो भाग वगळतो. पुण्यात नव्याने काही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे केलेली आहेत. तिथे व्यवस्था म्हणून त्याभागातील काही रस्ते, गल्ली येथे पत्रे लावण्यात आली आहेत. शहरातील काही भागांमध्ये व सिंहगड रोड येथील काही भागात ही पत्रे लावण्यात आली आहेत. ज्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र आहे. तिथे देखील कुठलाही लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. जो आदेश सिंहगड क्षेत्रीय कार्यलयातील अधिकाऱ्यांनी काढला आहे, तो आदेश मागे घेतला आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.