गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (21:59 IST)

म्हणून पुण्यातल्या 'या' गावात पुन्हा लॉकडाऊन

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी मंचर शहरामध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पुकारला आहे. शनिवारपासून ११ सप्टेंबरपर्यंत पुढील सात दिवसांसाठी हा लॉकडाऊन असणार आहे.
 
पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ८९ हजार ७२२ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख ३० हजार ३६६ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर पुण्यात आतापर्यंत ४३३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यातील कोरोना ऍक्टिव्ह रुग्णंची संख्या ५५०२३ इतकी आहे.
 
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८ लाख ६३ हजार ६२ इतका झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत एकूण ६ लाख २५ हजार ७७३ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात २ लाख १० हजार ९७८ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.