बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (18:34 IST)

पुण्यातील कोरोना स्थिती नियंत्रणासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर सक्रीय

देशात सर्वाधिक गंभीर परिस्थिती ही पुण्यात असल्याचे  मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील कोरोनाच्या गंभीर स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी  पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी विभागीय स्तरावरचा कोरोना स्थितीची सादरीकरण केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर सादर केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना केल्या.
 
जिथे गंभीर परिस्थिती आहे तिथे अधिकचे लक्ष घालून त्यामागची कारणे शोधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना जावडेकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे.तसेच पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही शहरातील कोरोना स्थितीचे सादरीकरण केले.
 
कोरोना रुग्ण वाढण्याची करणे ही यावेळी त्यांनी जावडेकरांना सांगितले. केंद्र सरकार नागरिकांना कोरोनापासून दिलासा देण्याकरिता डरो मत, सावधानी करो असा नारा देत आहे. याबद्दल नागरिकांमध्ये प्रबोधन केले पाहिजे अशा सूचनाही जावडेकर यांनी यावेळी केल्या.