शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'व्ही' चॅनल बंद होणार

आता ‘व्ही’ चॅनेलने आता आपला कारभार आवरता घेण्याचा निर्णय घेतलाय. या चॅनलमुळे कोणताच नफा होत नसल्यामुळे ‘स्टार इंडिया’ने व्ही चॅनल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चॅनलवरील ‘दिल दोस्ती डान्स’, ‘द बडी प्रोजेक्ट’, ‘हमसे है लाइफ’, ‘डेअर टू डेट’, ‘सड्डा हक’, ‘गुमराह’ मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. चॅनल ‘व्ही’ने गेली दोन दशके तरुणांच्या मनावर राज्य केले. तेव्हाच्या नव्या पिढीला अपील करणारे अनेक कार्यक्रम व्ही चॅनलवर पाहायला मिळाले. या चॅनेलवर नवीन चित्रपटांची गाणी, नवे शो आणि सेलिब्रिटीजचा राबता नेहमी असायचा. या कार्यक्रमांमधूनच अनेक व्हीजे मनोरंजन क्षेत्राला मिळाले.