गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

भारत चित्रपट सापडला वादात, नावावरून कोर्टात याचिका दाखल

controversy over name of Salman Khan Bharat movie
सलमान खानचा आगामी चित्रपट भारत ईदच्‍या मुहूर्तावर मोठ्‍या पडद्‍यावर येण्‍यास सज्‍ज आहे. परंतु, रिलीज होण्‍यापूर्वीच भारत या चित्रपटाच्‍या नावावरून दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्‍यात आली आहे. या याचिकेत म्‍हटले आहे की, भारत हे नाव देशाचे आहे. त्‍यामुळे त्‍यावरून चित्रपटाची कहाणी दाखवणे योग्‍य नाही. लोकांच्‍या भावना दुखावण्‍याची शक्‍यता आहे. 'भारत' या शब्दाचा उपयोग प्रोफेशनल आणि कमर्शियल उद्देशांसाठी केला जाऊ शकत नाही. आता भारत चित्रपटाच्‍या नावावरून दाखल केलेल्‍या याचिकेवर काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
 
अली अब्बास जफरच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनलेला भारत हा चित्रपट  ५ जूनला ईदच्‍या औचित्‍याने रिलीज होण्‍यास सज्‍ज आहे. चित्रपटात सलमान, कॅटरीनासोबत दिशा पटानी, तब्‍बू, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही आणि सुनील ग्रोवर यांच्‍या मुख्‍य भूमिका आहेत.